Belly Fat Loss Exercise at Home: पोट वाढलंय , वेळ नाही? उभ्याने २ मिनिटं 'हा' व्यायाम करा,

ब्युरो टीम: एकदा पोट सुटलं की कमी करणं खूपच कठीण होतं पोट कमी करण्यासाठी अनेक व्यायाम आहेत  पण रोजच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये व्यायामासाठी जीमला किंवा योगा क्लासेसला जायला अजिबात वेळ मिळत नाही.

अशावेळी घरच्याघरी उभ्या उभ्या तुम्ही साधा-सोपा व्यायाम केला तर बेली फॅट अगदी सहज कमी होईल.  योगा एक्सपर्ट हीरा लाल यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

वजन कमी करण्यासाठी सोपा व्यायाम 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सगळ्यात आधी भिंतीकडे तोंड करून उभं राहा. त्यानंतर एक हाताचं अंतर ठेवून भिंतीपासून लांब या आणि आपले दोन्ही हात भिंतीवर ठेवा. (Health Tips) त्यानंतर उजवा पाय गुडघ्यातून वर आणा परत खाली आणा नंतर डावा पायही गुडघ्यापासून वर आणा आणि पुन्हा पूर्व स्थितीत या. १ ते दीड मिनिटं हा व्यायाम कंटिन्यू करा. तुम्हाला व्यायामाची सवय झाल्यानंतर हळू हळू व्यायामाचा वेळ वाढवत जा. या व्यायामुळे तुमचा पेल्विक पार्ट एक्टिव्ह राहील. म्हणजेच ओटी पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यासही मदत होईल. (How to loss belly fat)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने