Best morning drinks: चहा आणि कॉफी नाहीत 'या' पेयाने होईल वजन कमी ;हजार पटीने बरे आहेत हे 4 ड्रिंक्स

ब्युरो टीम:जास्तीत जास्त लोक सकाळी उठून रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पितात. पण असं म्हटलं जातं की, कॉफी किंवा चहा रिकाम्या पोटी पिणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी आणि चहा प्यायल्याने पोटात अॅसिड जास्त वाढतं.

यामुळे पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. तसेच ब्लड शुगर लेव्हलमध्येही चढ-उतार होऊ शकतो. अशात तुम्ही हेल्दी पेयांची निवड करावी. आज आम्ही तुम्हाला 4 हेल्दी ड्रिंक्सबाबत सांगणार आहोत ज्यांचं सेवन फायदेशीर ठरू शकतं.

हळद आणि काळ्या मिऱ्यांचं पाणी

गरम पाण्याच 2 ते 3 चिमुट हळद आणि काळे मिरे मिक्स करून प्यायल्याने तुमच्या दिवसाची सुरूवात सुपर हेल्दी होऊ शकते. या ड्रिंकमुळे तुमचं मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील जास्त चरबीही कमी होण्यास मदत मिळते.


जिरं, बडीशेप आणि ओव्याचं पाणी


2 कप पाण्यात चिमुटभर जिरं, बडीशेप आणि ओवा टाकून उकडून घ्या. जेव्हा पाणी अर्ध होईल तेव्हा गाळून घ्या आणि हे पाणी एक एक घोट सेवन करा. याने वजन कमी करण्यास मदत मिळेल. तसेच शरीरातील सूजही कमी होईल.

लिंबू पाणी

कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळा. हवं तर तुम्ही यात थोडं मधही टाकू शकता. हे ड्रिंक आणखी शक्तीशाली बनवण्यासाठी यात तुम्ही चिमुटभर दालचिनीही टाकू शकता. याचं सेवन केल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतील.

कोमट पाणी

जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याचं सेवन केलं तर फार फायदा मिळतो. याने तुमचं शरीर हायड्रेट राहतं आणि मेटाबॉलिज्मही मजबूत होतं. तसेच याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने