ब्युरो टीम: १७ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्तने 'नरेंद्र दाभोलकरांचे विचार घरोघरी' या उपक्रमाअंतर्गत दाभोलकर लिखित १२ पुस्तिकांचा लोकार्पण समारंभ पार पडला. १२० रूपये मध्ये हा १२ पुस्तकांचा संच वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या प्रकाशन प्रसंगी मा कुलगुरू सुरेश गोसावी म्हटले की " वाचनाने माणसाच्या वैचारिक कक्षा रुंदावतात वेगवेगळे अनुभव विश्व कवेत घेता येतात तसेच विज्ञान आणि विज्ञानाविषयीची जागृती यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे" तसेच डॉ. अच्युत गोडबोले यांनी "वैज्ञानिक प्रयोग आणि त्यातून मांडले गेलेले विचार याद्वारे जुने सिद्धांत खोडून नवीन वैज्ञानिक शोध कसे लागतात याचा आढावा घेतला व डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबतच्या आपल्या आठवणी सर्वांना सांगितल्या. या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू मा .डॉ. सुरेश गोसावी तसेच प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिद्ध साहित्यिक अच्युत गोडबोले , विशेष उपस्थितीमध्ये मा. प्रताप पवार , अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्ट , डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात (महाराष्ट्र अंनिस कार्यकर्ते ) , डॉ. विलास आढाव ( अर्थशास्त्र विभाग प्रमुख) , विद्यापीठांमधील वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थी व कर्मचारी तसेच विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने तुकाराम शिंदे , ओम बोदले, अजय बनसोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल ससाणे यांनी केले तर सुत्रसंचालन सौरभ बगाडे व आभार प्रदर्शन सागर नाईक यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा