स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटी संदर्भात महाराष्ट्रात कडक कायदा येणार ? श्रेयवादासाठी विरोधी पक्षाची धडपड


   
ब्युरो टीम : राज्यात विविध स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान होणाऱ्या पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर असताना  भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया द्वारे दिले होते.


             मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील स्पर्धा परीक्षा संदर्भात समितीची बैठक या महिना अखेर बोलवली होती तशी माहिती माध्यमांनी दिली होती. हे दोन्ही संदर्भ लक्षात घेता येणाऱ्या कार्यकाळात सरकार याबाबत कडक कारवाई करण्याच्या तयारीत असून असा कायदा लवकरच अस्तित्वात येण्याची चिन्हे दिसत आहे. स्पर्धा परीक्षा पेपर फुटी संदर्भात असा कायदा अस्तित्वात आला तर पेपर फुटीला नक्कीच आळा बसेल अशी खात्री विद्यार्थ्यांना आहे.
           आता हा कायदा लवकरच येणार अशी शक्यता दिसत असल्यामुळे विरोधकांची याच्या श्रेयवादासाठी धडपड सुरू झालेली दिसते. यासंदर्भात कालच राष्ट्रवादी (शरद पवार गट ) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा कायदा व्हावा म्हणून निवेदन दिले अशी माहिती समोर येत आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया द्वारे हि माहिती दिली आहे. परंतु सरकार स्पर्धा परीक्षा पेपर फुटी संदर्भातील  कडक कायद्याबाबत सकारात्मक दिसत आहे. सरकार स्पर्धा पेपर फुटी संबंधीत योग्य ती पावले उचलत असताना या बाबत विरोधी पक्षांकडून सरकारला उशिरा निवेदन देणे, तसेच सरकार मध्ये असताना या बाबत कडक कारवाई न करणे हि फक्त निवडणुकी पुरती श्रेय लाटण्याची धडपड आहे का? असा प्रश्न काही विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने