सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का, एक खासदार अपात्र ठरणार ?


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे खासदार मोहम्मद फैजल यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने धक्का  दिला आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने त्यांना ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केला. त्यामुळे फैजल यांच्यावर पुन्हा लोकसभा सदस्य गमावण्याची वेळ येऊ शकते. लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार फैजल यांना केरळ उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्याने लोकसभेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले होते.

केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणात कायद्याच्या सर्व बाजूंकडे पुरेसे लक्ष दिले नसल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. बी. व्ही .नागरत्न यांच्या खंडपीठाने नोंदवले. न्यायालयाने उच्च न्यायालयाला सहा आठवड्यांत या प्रकरणाचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. जोपर्यंत उच्च न्यायालय या अपिलावर निर्णय देत नाही, तोपर्यंत फैजल यांची शिक्षा तूर्तास स्थगित राहील, असेही न्या. नागरत्न यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर खासदार फैजल यांना शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा निकाल त्यांच्या गटाला धक्का मानला जात आहे. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने