Health camp : जायकवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित खामगाव येथे आरोग्य शिबिर संपन्न सचिन काळे यांचा पुढाकार


ब्युरो टीम : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पग्रस्त पुनर्वसित खामगाव येथे सचिन काळे यांच्या नियोजनात आयोजित मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे उद्घाटन नेवासा तहसील मंडळ अधिकारी श्रीमती. संगीता पुंड व आरोग्य अधिकारी डॉ. राज पवार यांच्या हस्ते पार पडले.


 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहरी राऊत यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली व श्री. सचिन काळे यांच्या व्यवस्थापनेखाली मोफत आरोग्य शिबीर डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व ग्रुप ग्रामपंचायत खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. या मोफत आरोग्य शिबिराचा बहुसंख्य रूग्णांनी लाभ घेतला असून, डोळे येणे या साथीच्या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी हे आरोग्य शिबीर महत्त्वपूर्ण ठरले आहे. जायकवाडी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या विविध आजारावर औषधोपचार करण्यासाठी हे मोफत आरोग्य शिबीर जीवनदायी ठरले आहे.


या शिबिरात 500 हुन अधिक रुग्णांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. यावेळी मंडळ अधिकारी श्रीमती. संगीता पुंड, डॉ.राज पवार, सरपंच केदार आगळे,मुख्याध्यापक श्री.ढोकणे सर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन चे वैद्यकीय प्रमुख सचिन काळे यांनी रूग्ण सेवा व निरोगी आरोग्य विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य तपासणीसाठी आलेल्या नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले.


यावेळी राठोड सर,पवार मॅडम, खामगाव चे तलाठी भाऊसाहेब, ग्रामसेवक चेमटे भाऊसाहेब,श्री.राजेंद्र मेथे,सामाजिक कार्यकर्ते श्री. बंडू आबा काळे,श्री.मच्छिंद्र साबळे, श्री.बाबासाहेब आघम, श्री.अंकुश आगळे, श्री.आत्माराम रासकर, श्री. बाबासाहेब शेलार, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव वैद्यकीय टीम, ग्रामपंचायत सदस्य, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.




 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने