ब्युरो टीम: समाजात आजही अंधश्रद्धा कायम आहे. ही अंधश्रद्धा धार्मिक प्रबोधनातून दूर करण्यासाठी योगिराज सदगुरू गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा अतिशय महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
वैजापूर येथे योगिराज सदगुरू गंगागिरी महाराज यांचा १७६ वा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सुरू आहे. आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या सप्ताहात भेट दिली. यावेळी रामगिरी महाराज यांना शाल व पुष्प भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित भविकांशी संवाद साधला.
यावेळी आमदार रमेश बोरनारे,माजी खासदार चंद्रकांत खैरे,राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज घोडके,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, बाजार समितीचे सभापती किसनराव धनगे, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक,समाधान जेजुरकर,सचिन कळमकर, बाळासाहेब गुंड,मकरंद सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ पुढे म्हणाले की, योगिराज सदगुरू नारायणगिरी महाराज यांनी सुरू केलेली धार्मिक प्रबोधनाची चळवळ आज रामगिरी महाराज यांच्या माध्यमातून पुढे कायम सुरू आहे.हा सोहळा अनुभवने हे प्रत्येक भाविकांसाठी पर्वणी असते. सरला बेटाच हे काम समाजाच्या उन्नतीसाठी अतिशय महत्वाचे आहे अ
टिप्पणी पोस्ट करा