Chandrayaan3 - शेवटी चांदोबा मामाला इस्त्रो मधुन भाचा जाऊन भेटला

 


भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवले, दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेला चांद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश आजच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वी लँडिंग नंतर पुसून काढण्यात शास्त्रज्ञांना यश  आलं आहे.

इस्त्रोनं सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरी कोटा येथून १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चे प्रक्षेपण केलं होतं. त्यानंतर आज २३ ऑगस्टपर्यंत प्रत्येक पातळीवर भारताला यश मिळालं होतं. यावेळी भारतानं ऑर्बिटर न पाठवता प्रॉपल्शन मॉड्यूल पाठवलं होतं. त्यामध्ये देखील अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिले. या इंधनाचा उपयोग करून हे मॉड्यूल चंद्राभोवती पुढील किमान सहा महिने फिरत राहून ग्रहाचा अभ्यास करेल.

चांद्रयान २ च्या मोहिमेत अपयश आल्यानंतर चांद्रयान ३ च्या मोहिमेत बदल करण्यात आले होते. चांद्रयान ३ ला लँडिंगसाठी जागा निवडण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. याशिवाय चांद्रयान मोहिमेत सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांनी देखील चांद्रयान मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. आज भारतीय यान यशस्वीपणे संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले. चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता तो खरा करुन दाखवला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने