CHANDRAYAAN 3 : खूप अभिमान...' ISRO चा शर्ट दिवसभर घालून फिरला रितेश देशमुख, चांद्रयान -३ ला दिला पाठिंबा

ब्युरो टीम: संपूर्ण भारतीयांसाठी कालचा क्षण अभिमानाचा ठरला जेव्हा भारताचा विक्रम लँडर चंद्रावर पोहोचला. चांद्रयान 3 यशस्वी होणार का ही धाकधूक जशी ISRO ला होतीच. सोबतच सगळे भारतीयही या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते.

ISRO टीमने करुन दाखवलंच आणि चंद्रावर पोहोचणाऱ्या देशांमध्ये भारतही सामील झाला. अभिनेता रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) एक प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये काल संपूर्ण दिवस तो ISRO चा शर्ट घालूनच फिरत होता असं सांगतोय.

कालचा २३ ऑगस्ट हा दिवस सर्वच भारतीयांना कायम स्मरणात राहणारा आहे. काल दिवसभर भारतीयांमध्ये आणि ISRO च्या वैज्ञानिकांमध्ये एक वेगळीच धाकधूक होती. दरम्यान अभिनेता रितेश देशमुख एका इव्हेंटला पोहोचला असता त्याच्या शर्टने सर्वांचंच लक्ष वेधलं. कारण शर्टवर ISRO असं लिहिलं होतं. याबद्दल त्याला विचारलं असता तो म्हणाला,'आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. मी तर सकाळपासूनच खूप खूश आहे आणि दिवसभर ISRO चा शर्ट घालून फिरत आहे. आम्हाला भारतवासी असल्याचा अभिमान आहे. कायमच आमचा देशाला पाठिंबा असेल.'

संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रयान ३ लँड झालं आणि भारताने इतिहास रचला. यानंतर रितेशने ट्वीट करत लिहिले, 'सबसे आगे होंगे हिंदुस्तानी! आमचा ऊर अभिमानाने भरुन आला यासाठी चंद्रयान ३ च्या टीमचं आणि इस्रोचं अभिनंदन. जय हिंद!'

कालच्या अभूतपूर्व यशानंतर सर्वत्र भारताचा गौरव होत आहे. संपूर्ण देशवासियांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे. ही दिवस दाखवण्यामागे ISRO च्या टीमने प्रचंड मेहनत घेतली. त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने