Chandrayaan - 3: विक्रम लँडरमधून उतरले रोव्हर! पहाटेच चंद्रावर मारला फेरफटका, इस्त्रोने ट्विट करुन दिली माहिती

 

ब्युरो टीम:  काल बुधवारी इस्त्रोच्या चंद्रयान-३च्या विक्रम लँडरच्या सॉफ्टलँडिंग यशस्वी झाले. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी इस्रोमधील शास्त्रज्ञांनी घेतलेल्या अथक परिश्रमांना गोड फळ आले. चंद्रयान-३चे विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर हे चंद्राच्या पृष्ठभागावर दाखल झाले असून आता तेथील सखोल संशोधनाला झाली आहे.

आज सकाळीच इस्त्रोने आणखी एक अपडेट दिली आहे. 'चंद्रयान-3 चा 'प्रज्ञान' रोव्हर विक्रम लँडरवरून खाली उतरला आणि त्याने चंद्राच्या भूमीवर फेरफटका मारला, असं ट्विट इस्त्रोने केले.

चंद्रावर उमटली भारतमुद्रा! ISRO ने रचला इतिहास; दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 'विक्रम' लँडरमधून रोव्हर 'प्रज्ञान' यशस्वीपणे बाहेर काढल्याबद्दल इस्रो टीमचे अभिनंदन केले. वैज्ञानिक रोव्हरच्या माध्यमातून चंद्रावरील माहिती घेण्याचा प्रयत्न करतील. रोव्हर हे ६ चाकी रोबोटिक वाहन आहे, जे चंद्राच्या पृष्ठभागावर चालेल आणि नंतर फोटो काढेल. ISRO चा लोगो आणि भारताचा तिरंगा प्रज्ञान रोव्हरमध्ये बनवला आहे.

चंद्रावर लँडर उतरल्यानंतर चार तासांनी प्रज्ञान रोव्हर बाहेर आले. प्रग्यानच्या वेग प्रति सेकंद एक सेंटीमीटर वेगाने धावेल. यादरम्यान, कॅमेऱ्यांच्या मदतीने, चंद्रावर उपस्थित असलेल्या गोष्टींचे रोव्हरवर स्कॅनिंग केले जाईल. प्रज्ञान चंद्रावरील हवामानाचीही माहिती देणार आहे. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उपस्थित आयन आणि इलेक्ट्रॉनचे प्रमाण देखील शोधेल.

चंद्रयान-3 मोहिमेच्या लँडर 'विक्रम'ने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सपाट क्षेत्र निवडले. त्याच्या कॅमेऱ्यातून काढलेल्या फोटोवरून ही बाब समोर आली आहे. इस्रोने सांगितले की, विक्रम यशस्वीपणे चंद्रावर पोहोचल्यानंतर लगेचच लँडिंग इमेजर कॅमेऱ्याने हे फोटो काढले. फोटोमध्ये चंद्रयान-३ च्या लँडिंग साइटचा काही भाग दिसत आहे.

"चंद्रयान-3 ने चंद्राच्या पृष्ठभागावरील तुलनेने सपाट क्षेत्र निवडले," अंतराळ संस्थेने सांगितले की, लँडर आणि इस्रोच्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स यांच्यात संवाद देखील झाला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना चंद्रयान-3 ने काढलेली फोटोही इस्रोने प्रसिद्ध केली आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने