Devendra fadanvis : इथे औरंगजेब नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजच हिरो !

ब्युरो टीम : औरंगजेब हा येथे कोणाचाही हिरो होऊ शकत नाही. येथील मुस्लिम समाजाचाही तो हिरो नाही. इथे हिरो असलेच तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजच असू शकतात.

महाराणा प्रताप असू शकतात. एपीजे अब्दुल कलाम हे हिरो असू शकतात. त्यामुळे या राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. असे उदात्तीकरण करणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

गृहमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात अलीकडे मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस ठवून औरंगजेब हा हमारा बाप असा आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. अशांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहील. मात्र हे महाराष्ट्रात अत्यंत नियोजनपूर्वक घडवले जात आहे, अशी आमच्याकडे माहिती आहे. सभागृहात ती देता येत नसली तरी त्याचा पाठपुरावा सुरु आहे. तपास युद्ध पातळीवर सुरु आहे.

ही लक्षवेधी आ. राणे मांडत असताना सपाचे आमदार अबू आझमी आणि आ. रइस शेख यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावर भाजप आणि शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. भाजप नेते आमदार अतुल भातखळकर, आ. राम सातपुते, आ. महेश लांडगे यांनी आ. आझमी यांच्या भूमिकेला विरोध केला. यावर गृहमंत्री फडणवीस म्हणाले, राष्ट्र प्रथम मानले पाहिजे. मतांच्या राजकारणासाठी अशी भूमिका ठेवणे योग्य नाही.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने