ब्युरो टीम: करतो माझे आणि विनायकराव मेटे साहेबांचे संबंध भावापेक्षाही अधिक जवळचे होते आणि ते राजकारण, समाजकारणा पलीकडे होते त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती न भरून निघणारी आहे.
मी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर महामंडळ स्थापन करू शकलो असलो तरी महामंडळातील सर्वाधिक योजना देण्याचे काम हे विनायकराव मेटे यांनी केले त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता ऊसतोड मजुरांचा नेता म्हणून काम करत असताना मेटे साहेबांनी मला नेहमीच लहान भावासारखे मार्गदर्शन केले आज जे ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी वीस वस्तीग्रह कार्यान्वित करण्यासंदर्भात आपण बोलत आहोत या वस्तीग्रहाची प्रामुख्याने कल्पना ही स्वर्गीय मेटे साहेबांची होती. शिवसंग्राम परिवार हा माझा परिवार आहे माझे आणि मेटे साहेबांचे राजकारणापलीकडे संबंध असल्यामुळे त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. असे मत श्रद्धांजली अर्पण करताना ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले
टिप्पणी पोस्ट करा