ब्युरो टीम: बॉक्स ऑफीसवर गदर 2 ची ट्रेन सुसाट धावताना दिसत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले आहेत पण दुसऱ्या आठवड्यातही कमाईचा वेग कायम आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद सनी देओलच्या गदर 2 मिळताना दिसत आहे.यासोबतच गदर 2 ने सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' आणि आमिर खानच्या 'पीके' सारख्या चित्रपटांना देखील कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे.
विशेष म्हणजे रिलीजच्या 10 व्या दिवशी याने ओपनिंग डे पेक्षा जास्त कमाई केली आहे.गदर 2 ने आतापर्यंत भारतात 377.20 कोटींचा गल्ला केला आहे. Sacnilk च्या अहवालानुसार, गदर 2 ने रविवारी 41.00 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, गदर 2 ला दुसऱ्या रविवारी एकूण 72.60% हिंदी व्याप मिळाला, ज्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 377 कोटी रुपये झाले. हे सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर टायगर जिंदा है पेक्षा जास्त आहे.
2017 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे लाइफटाईम कलेक्शन 339.16 कोटी रुपये होते. फक्त सलमान खानच्या नाही तर सनी देओल, अमिषा पटेल स्टारर 'गदर 2'नेही आमिर खानच्या 'पीके'ला देखील कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकले आहे. 2014 मध्ये रिलीज झालेल्या पीकेने बॉक्स ऑफिसवर 340.8 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. आता सोमवारी गदर 2 आमिर खानच्या दंगलचा रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी त्याने 40 कोटींचा व्यवसाय केला आणि आता रिलीजच्या 10 व्या दिवशी 41 कोटींची कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.22 वर्षांनंतर दिग्दर्शकाने गदर 2: एक प्रेम कथा सादर केली आहे, ज्याला लोक पूर्वीच्या चित्रपटाप्रमाणेच प्रेम देत आहेत.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रजनीकांतच्या जेलर आणि अक्षय कुमारच्या OMG 2 ला टक्कर देत आहे. सनी आणि अमिषासोबत या चित्रपटात उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, लव सिन्हा आणि मनीष वाधवा यांच्याही भूमिका आहेत.हेमा मालिनी यांनी देखील केलं सनी देओलच्या सिनेमाचं कौतुकसध्या सगळीकडेच गदग 2 ची चर्चा आहे. नुकतीच सनी देओलची बहीण ईशा देओलनं त्याच्यासाठी खास स्क्रीनींग पार्टी ठेवली होती. तर हेमा मालिनी या शनिवारी रात्री एका चित्रपटगृहाबाहेर दिसल्या होत्या.
गदर 2 पाहिल्यानंतर हेमा मालिनी यांनी तिथल्या मीडियासोबत या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला. यावेळी हेमा मालिनी म्हणाल्या की, खूप छान वाटलं. सिनेमा खूपच मनोरंजक करणारा आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना पुन्हा 70 आणि 80 च्या दशकात गेल्यासारखं वाटलं.
अनिल शर्मा जी यांनी खुपच उत्तम दिग्दर्शन केलयं. सनीनेही खुपच शानदार असा अभिनय केला आहे. असं म्हणत त्याचबरोबर त्यांनी उत्कर्ष शर्मा आणि सिमरतच्या अभिनयाचंही कौतूक केले.हा सिनेमा पाहिल्यानंतर देशप्रेमाच्या भावनेने मन भरुन येते. हिंदू आणि मुस्लिमांप्रती बंधुभाव असायला हवा हा विषय चित्रपटात शेवटपर्यंत दाखवण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तानसाठी खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. 22 वर्षांनंतरही सनी आणि अमिषा एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. दोघांनी खूप चांगलं काम केलं आहे. चित्रपटाची गाणी त्याकाळी खूप हिट झाली होते आणि त्याचा रिमेक केल्यानंतरही गाणी खुप चांगली आहेत. त्यामुळे चित्रपट खूप छान वाटला, असल्याचे त्या म्हणाल्या.
टिप्पणी पोस्ट करा