Gadar2: 'गदर 2' पोहचला 'पठाण 'च्या जवळ रक्षाबंधनाच्या दिवशी केली छप्परफाड कमाई

 

ब्युरो टीम: सनी देओलच्या  'गदर 2'चा  धुमाकूळ काही थांबता थांबत नाही. २० दिवस झाले सिनेमा कमाईचे डोंगर रचतोय. काल रक्षाबंधन असल्याने ११ ऑगस्टला रिलीज झालेल्या सिनेमाने पहिल्या दिवशीपासूनच धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती.

१५ ऑगस्टची सुट्टी, वीकेंड या सर्वच गोष्टींचा सिनेमाने फायदा घेतला. त्यातच काल २० व्या दिवशी रक्षाबंधन सण आल्याने त्याचाही सिनेमाला फायदा झालाय. 'गदर 2'ची एकूण कमाई 474.5 कोटी रुपये झाली आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी किती कमाई?

काल 'गदर 2'च्या रिलीजचा २० वा दिवस होता. त्यात रक्षाबंधन असल्याने अनेकांना सुट्टी होती. आताच रिलीज झालेल्या ड्रीम गर्लने फारसे यश मिळवले नसल्याने प्रेक्षकांनी 'गदर 2' बघण्यालाच पसंती दिली. काल सिनेमाने तब्बल 8.75 कोटी रुपये कमावले. यासोबतच सिनेमाचं एकूण कलेक्शन 474.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं.

'गदर 2'चा प्रवास 40.10 कोटींच्या ओपनिंग कलेक्शनने सुरु झाला. २० दिवसांपासून हा प्रवास सुरुच आहे. सनी देओलची क्रेझ परत आली आहे. अनिल शर्मा यांच्या 'गदर 2' चं एकूण बजेट केवळ 60 कोटी होतं. तर सिनेमाने बजेटच्या आठपट कमाई केली आहे. दरम्यान 'गदर 2' सध्यातरी २०२३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा आहे. शाहरुखच्या 'पठाण'ने एकूण 543.5 कोटींची कमाई केली आहे. पठाणचं रेकॉर्ड मोडण्यासाठी 'गदर 2'ला आणखी 68.55 कोटींचं कलेक्शन करण्याची गरज आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने