Hari narke : जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, निसर्गकवी ना.धों. महानोर आणि शाहीर गदर यांना आदरांजली ; विदयार्थ्याचा पुढाकार


ब्युरो टीम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती व इतर समविचारी संघटनांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या समोर १० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, निसर्गकवी ना.धों. महानोर आणि शाहीर गदर यांना आदरांजली वाहण्यात आली.

महात्मा फुले , सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य आपल्या लेखनामधून आणि प्रत्यक्ष कृती मधून प्रा. हरी नरके यांनी समाजातील तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले. विद्यापीठामधील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख असताना त्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलेले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासंदर्भात तसेच पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या प्रक्रियेमध्ये देखील त्यांचा सहभाग मोलाचा होता.

या शोकसभेसाठी विद्यापीठांमधील वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते. इतिहास विभागाच्या विभागप्रमुख डॉ. श्रध्दा कुंभोजकर यांनी हरी नरके यांच्या विषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने