Health : शरिरासाठी आहे उपयुक्त; फक्त 4 महिनेच असते बाजारात! या भाजीचं नाव आहे विचित्र;


ब्युरो टीम : देशाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिकं घेतली जातात. भाजीपाल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक घटक असतात. त्यामुळे भाज्या आहारात असणं आवश्यक असतं. एका अनोख्या भाजीबद्दल जाणून घेऊ या.

ती आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. ही भाजी प्रामुख्याने राजस्थानमध्ये पिकवली जाते. तसंच, ती तीन-चार महिनेच बाजारात उपलब्ध असते. राजस्थानव्यतिरिक्त आणखीही काही ठिकाणी ही भाजी पाहायला मिळते.

या भाजीला आपल्याकडे शेंदाड म्हणतात किंवा कचरी अथवा काचरी असं म्हटलं जातं. त्या भाजीचं इंग्रजीतलं नाव माउस मेलन (Mouse Melon) असं आहे. ही भाजी काकडीवर्गीय आहे. म्हणजेच काकडी, तोंडली, कर्टुली, पडवळ वगैरे भाज्या ज्या कुळातल्या आहेत, त्याच कुळातली ही भाजी आहे.

या भाजीत शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सचं भांडार असतं. या भाजीची माहिती घेऊ या.इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, कचरी ही भाजी प्रोटीनचा एक मोठा स्रोत असते. त्यात अनेक औषधी गुणधर्मही असतात. ते गॅस्ट्रोइन्टेस्टिनल वेदनांपासून दिलासा देण्यात मदत करतात.

या भाजीत अँटीऑक्सिडंट्स असल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यात अनेक पौष्टिक घटक असतात. कचरी ही भाजी सुकवून खाल्ली जाते आणि तिची पावडरही बनवली जाते. कचरी या भाजीची पावडर अनेक राजस्थानी खाद्यपदार्थांत वापरली जाते.(पावसाळ्यात भजी खाऊन सुद्धा वजन कमी करता येईल?

जाणून घ्या लो कॅलरीज पकोड्यांची रेसिपी)पाच महत्त्वाचे फायदे- कचरी या भाजीत शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणेला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे आजारांचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.- या भाजीत प्रोटीन्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे या भाजीचं सेवन केल्यास स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

साहजिकच शरीरही मजबूत होतं.- कचरी या भाजीचं सेवन केल्यामुळे गॅस्ट्रोइन्टेस्टिनल ट्रॅक अर्थात पोटाच्या समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे या भाजीचं सेवन पोटासाठी लाभदायक आहे.- कचरी भाजीचा आहारात समावेश केल्यास भूक न लागण्याची समस्या दूर होऊ शकते. या भाजीचं सेवन केल्यास भूक वाढते आणि आरोग्य अधिक चांगलं होतं.- डायबेटीसग्रस्तांसाठीही ही भाजी उपयुक्त मानली जाते. कचरी ही भाजी रक्तशर्करा अर्थात ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी मदत करू शकते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने