Health Tips : पायर्‍या चढताना तुम्हाला दम लागतो का? याकडे दुर्लक्ष करू नका; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

 


ब्युरो टीम : सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनात बहुतेक लोकांना त्यांच्या आरोग्यकडे लक्ष (Health Tips) द्यायलासुद्धा वेळ नसतो. सकस आहाराची कमतरता आणि दीर्घकाळ घरात राहिल्यामुळे लोकांमध्ये अशक्तपणा (Health Tips) वाढला आहे.

बदलत्या जीवनमानानुसार लोकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे.

पायर्‍या चढताना तुम्हाला दम लागतो का?

अनेकांना काही पाऊल चालल्यावर किंवा एखादं लहान काम करताना दम लागतो. काही जण शरीराची थोडी जास्त हालचाल झाल्यावर अस्वस्थ होतात आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. मात्र, याकडे दुर्लक्ष करु नका. हे, धोकादायक आजाराचे गंभीर लक्षण असू शकते.

'या' 5 पैकी एका गंभीर आजाराचा धोका

फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार, फुफ्फुसात किंवा हृदयामध्ये संसर्ग, पॅनीक अटॅक आणि फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीत अडथळा यांमुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि तुम्ही पायऱ्या चढून किंवा वेगाने चालता तेव्हा श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या पाच गंभीर आजारांचा धोका तुम्हाला असू शकतो.

याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

अनेक लोक जिने चढण्याऐवजी लिफ्ट वापरण्यास प्राधान्य देतात, कारण दोन-चार पायऱ्या चढताच त्यांचा श्वास फुलायला लागतो. काही पाऊल चालल्यावर त्यांना दम लागतो आणि त्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढतात. पायऱ्या चढताना धाप लागणे ही सामान्य गोष्ट आहे, पण जर एखाद्या व्यक्तीला असे जास्त वेळ होत असेल तर याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने