Health Tips : सकाळी उठल्यानंतर एक तास कॉफी पिणे टाळा, अन्यथा 'या' समस्यांचा करावा लागेल सामना

 

ब्युरो टीम:  प्रत्येकाची सकाळ ही वेगवेगळ्या पद्धतीने सुरु होते. काहींना सकाळी उठल्या बरोबर लिंबू पाणी लागते तर काहींना बेडवरच कॉफी पिण्याची इच्छा असते. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना उठल्यानंतर लगेच कॉफी पिण्याची सवय असेल तर ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते.

सकाळी उठल्यानंतर एक तासापर्यंत आपण कॉफी पिणे का टाळावे या संबंधित अधिक माहिती जाणून घेऊयात.

सकाळ झाल्यानंतर तासाभरात कॉफी पिऊ नये, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याची काही कारणे आहेत. लोकांना असे वाटते की, जर त्यांनी उठल्याबरोबर कॉफी घेतली तर ते त्यांना दिवसभर सक्रिय होण्यास मदत करेल. पण यामध्ये तथ्य नाहीये. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दिवसा आपला मेंदू अॅडेनोसिन नावाचे रसायन तयार करतो, ज्यामुळे आपल्याला झोप येते.

कॅफिन काय करते?

जेव्हा आपण बराच वेळ जागे राहतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एडेन्सिन तयार होते. यामुळे आपल्याला झोप येऊ लागते. पण जसे आपण कॅफिन घेतो, ते एडेनोसिन रिसेप्टर्सला ब्लॉक करते. हे तुम्हाला सतर्क ठेवते आणि तुम्हाला जागे होण्यास मदत करते. जर तुम्हाला कॉफी प्यायल्यानंतरही झोपेचा त्रास होत असेल तर त्याचे हे कारण आहे.

तसेच, जेव्हा कॉफी पिण्याची योग्य वेळ येते, तेव्हा झोपेतून उठल्यानंतर किमान एक तास थांबावे. यानंतरच कॉफी प्यावी. खरंतर, व्यक्तीला जागृत ठेवणारी कोर्टिसोल पातळी नंतर कमी होऊ लागते. जर तुम्हाला खरोखरच कॉफीचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही उठल्यानंतर एक तास थांबावे.

तासभर का थांबणं गरजेचं?

जेव्हा आपण जागे होतो, तेव्हा आपली कोर्टिसोल पातळी त्याच्या उच्च पातळीवर असते. कॉर्टिसॉल, जो तणावाशी संबंधित आहे, तुमची सतर्क राहण्याची क्षमता वाढवते. त्यामुळे जेव्हा तुमची कोर्टिसोलची पातळी जास्त असते आणि तुम्ही कॅफीनचे सेवन करता तेव्हा ते त्याविरुद्धही काम करू शकते. त्यामुळे तासभर थांबणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही पण जर कॉफी प्रेमी आहात. तर, सकाळी उठल्यानंतर एक तास थांबा आणि त्यानंतरच कॉफीचं सेवन करा.

टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने