Health : सकाळी पहिला चहा पांचट लागला ; या चार टिप्स वापरून पहा चहा होईल भारी



ब्युरो टीम : सकाळचा गरमागरम चहा हा कित्येकांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. सकाळचा एक कप चहा म्हणजे दिवसाची उत्तम सुरुवात असं काही लोक मानतात. सकाळची चहा पिऊनच पुढच्या दिवसाला काहीजण सुरुवात करतात.

परंतु हा चहा जर फक्कड नसेल किंवा आपल्या मनासारखा झाला नसेल तर दिवसाची सुरुवात झाल्यासारखे वाटतं नाही. काहीजणांच्या जिभेवर सकाळच्या चहाची चव इतकी पक्की बसलेली असते की, त्या चवीत किंचितही बदल झाला तर तो चहा पिणे नकोसे वाटते. याचबरोबर सकाळच्या चहाची चव बिघडली तर आपला सकाळीच मूड चिडचिडा होतो.

काहीवेळा सकाळच्या कामाच्या गडबडीत आपण चहा बनवताना बरेच घोळ होतात. त्याचबरोबर काहीवेळा साखर, दुधाचे प्रमाण यात काहीतरी गडबड होते, यामुळे चहा हवा तास बनत नाही. काहीवेळा तर या रोजच्या चहाची चव प्रत्येक दिवशी वेगळी लागते. कधी चहा अतिशय गोड होतो तर कधी पाणचट. कधी हातून दुधाचे प्रमाण जास्त होते तर कधी चहा पावडर योग्य प्रमाणात घातली जात नाही. अशावेळी सकाळच्या चहाचा फक्कड बेत फसतो. यामुळे सकाळचा चहा अगदी परफेक्ट होण्यासाठी काही खास टिप्स(How To Make Authentic Indian Masala Chai Recipe).

साहित्य :- (३ कप चहासाठी)

१. चहा पावडर - ३ टेबलस्पून
२. साखर - ६ टेबलस्पून
३. गवती चहा - १ टेबलस्पून
४. लवंग - २ काड्या
५. वेलची - २ ते ३
६. आल्याचा तुकडा - दिड इंच
७. पाणी - २ कप
८. दूध - दिड कप दूध

कृती :-

१. सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित उकळवून घ्यावे.
२. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात सर्वप्रथम लवंग घालून मग ठेचून घेतलेलं आलं घालावं.
३. त्यानंतर गवती चहाची पाने कैचीने बारीक कापून घेऊन पाण्यांत घालावीत.
४. आता हे चहाचे एकत्रित मिश्रण एक ते दिड मिनिट उकळवून घ्यावे.
५. चहाचे हे मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार साखर घालून घ्यावी.
६. साखर घातल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात चहा पावडर घालावी.
७. आता गॅस मंद आचेवर करून चहा २ ते ३ मिनिटे उकळवून घ्यावा.
८. चहा उकळत असताना त्यात वेलची ठेचून सालीसकट घालावी.
९. आता चहामध्ये दूध घालावे.

आपला चहा पिण्यासाठी तयार आहे. हा चहा गाळणीने गाळून पिण्यासाठी सर्व्ह करावा.

सकाळचा चहा अगदी परफेक्ट होण्यासाठी काही खास टिप्स...

१. चहासाठी पाणी गरम करायला ठेवल्यावर आपण त्यात लगेच चहाचे इतर साहित्य घालतो. परंतु हे संपूर्णपणे चुकीचे आहे. असे केल्यास चहामधील इतर घटकांची चव चहामध्ये उतरत नाही. त्यामुळे सर्वप्रथम चहा साठी पाणी गरम होऊन पूर्णपणे उकळू द्यावे. मग पाणी उकळ्यानंतर त्यात एक एक करून अनुक्रमे सगळे जिन्नस घालावेत, एका वेळी सगळे जिन्नस घातल्यास चहा बेचव होतो.

२. चहामध्ये आल्याचा वापर करताना आलं किसून घालण्याची चूक करु नका. चहामध्ये आलं किसून घातल्यास आल्याचा कडवटपणा चहात उतरतो. त्यामुळे चहात आलं घालताना ते किसून किंवा त्याचा अक्खा तुकडा घालण्याऐवजी ते कायम ठेचून घालावे.

३. चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम पाणी व्यवस्थित उकळून घेऊन मग त्यात अनुक्रमे लवंग, ठेचून घेतलेलं आलं, गवती चहा घालून घ्यावे. हे सर्व जिन्नस पाण्यात घातल्यानंतर किमान १ ते २ मिनिटे चांगले उकळवून घ्यावे. हे उकळत असताना त्यात चहा पावडर घालण्याची चूक करु नका. यामुळे लवंग, गवती चहा, आल्याचे फ्लेव्हर चहात उतरणार नाहीत. त्यामुळे हे सगळे जिन्नस पाण्यांत घातल्यावर उकळवून घ्यावे, जेणेकरून त्याचे सगळे फ्लेव्हर पाण्यांत उतरतील.

४. चहामध्ये दूध घातल्यानंतर केवळ एक ते दिड मिनिटे चहा उकळवून घ्यावा. त्यापेक्षा अधिकवेळ चहा उकळवू नये. यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने