Health : कोशिंबीर आहे शरीरासाठी घातक ; जाणून घ्या कारण



ब्युरो टीम : आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना दह्यासोबत खाण्यास सक्त मनाई आहे, अशीच एक गोष्ट म्हणजे कांदा. कांदा आणि दही एकत्र खाण्यापासून आरोग्याला हानी होते.

दही (Curd) एक असा पदार्थ आहे.

जो आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये खाण्यासाठी आवडतो. काही ठराविक पदार्थात दही घातल्यास पदार्थाची चव वाढते. बरेच जण जेवताना दही खातात. तर बऱ्याच जणांना जेवताना कोशिंबीर खाण्यास आवडतं. त्यात कोशिंबीरमध्ये दही घातलेलं अनेकांना आवडतं. पण असे केल्यास कोशिंबीरची चव वाढू शकते, पण नकळत त्याचा आरोग्याला खूप त्रास होऊ शकतो. आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांना दह्यासोबत सेवन करण्यास सक्त मनाई आहे, अशीच एक गोष्ट म्हणजे कांदा. चला जाणून घेऊया कांदा आणि दही एकत्र खाल्ल्याने आरोग्याला काय धोका होतो.

कांदा आणि दही एकत्र का खाऊ नये?

आयुर्वेदानुसार दही आणि कांदा या दोन्हीचे वेगवेगळे परिणाम आहेत. कांदा प्रभावाने गरम आहे आणि दही प्रभावाने थंड आहे. या दोन गोष्टींचे एकत्र सेवन केल्याने व्यक्ती दाद, खाज, खाज, एक्जिमा, सोरायसिस, त्वचा आणि पोटाशी संबंधित अनेक आजारांना बळी पडू शकते.

गॅस समस्या

जर तुम्हाला आधीच गॅस बनणे किंवा पोटात दुखणे आणि जळजळ होण्याचा त्रास होत असेल तर चुकूनही दही आणि कांदा एकत्र खाऊ नका. यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.

त्वचेच्या समस्या

कांद्यासोबत दही खाल्ल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. असे केल्याने व्यक्तीमध्ये त्वचेवर पुरळ उठणे, दादाची खाज येणे या समस्या वाढतात.

दह्यासोबत 'या' गोष्टींचे सेवन करू नका

दूध आणि दही -

दूध आणि दही एकत्र सेवन केल्याने मळमळ आणि पोट खराब होण्याबरोबरच अॅसिडिटी आणि गॅस होऊ शकतो.

दही आणि उडीद डाळ-

दही आणि उडीद डाळ यांचे हे मिश्रण आरोग्यालाही हानी पोहोचवते. दह्यासोबत उडदाची डाळ पोटात जाऊन शरीराच्या पचनसंस्थेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे व्यक्तीला पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

आंबा आणि दही-

आंबा आणि दह्याचं हे फूड कॉम्बिनेशन तुम्हाला खूप आवडत असलं तरी चुकूनही या दोन गोष्टी एकत्र खाऊ नयेत. आंबा आणि दही यांच्या वेगवेगळ्या परिणामांमुळे या दोन्ही गोष्टी शरीरासाठी विष बनतात.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने