health: पावसाळ्यात 'या' गोष्टींचं सेवन करणं पडू शकतं महागात, वेळीच व्हा सावध


ब्युरो टीम:  भारतात जास्तीत जास्त राज्यांमध्ये पावसाने धडक दिली आहे. पाऊस आला की, गरमी दूर होते. पण पावसासोबत काही आजारही येतात. डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकला या समस्या होतात.


हेल्थ एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, पावसाळ्यात घर स्वच्छ ठेवा आणि खाण्या-पिण्याचीही काळजी घ्या. या दिवसात आहाराबाबत निष्काळजीपणा करणं महागात पडू शकतो. पावसाळ्यात सगळ्यात जास्त समस्या बाहेरच्या खाण्याने आणि पिण्याने होते. जसे की, तळलेले पदार्थ. अशात तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, पावसाळ्यात बाहेरचं काय खाऊ नये.


1) हिरव्या भाज्या - पावसाळ्यात हिरव्या भाज्या जसे की, पत्ता कोबी, पालक खाऊ नये. एक्सपर्टनुसार, पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि फंगस इन्फेक्शनचा धोका वाढतो. पालेभाज्यांमध्ये कीटक आणि बॅक्टेरिया वाढतात. पावसाळ्यात भाज्या खाल्ल्याने पोट खराब होतं. त्यामुळे पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणं टाळा.


2) तळलेले पदार्थ - पावसाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नये. या पदार्थांमुळे शरीरात फॅट आणि पित्त वाढतं. जे शरीरासाठी नुकसानकारक आहे. अशात समोसे, भजी असे तळलेले पदार्थ खाऊ नये. याने तुम्हाला डायरिया होण्याचा आणि डायजेशन बिघडण्याचा धोका असतो.


3) मशरूम - डॉक्टर सांगतात की, पावसाळ्यात मशरूमचं सेवन अजिबात करू नये. जमिनीतून उगवणाऱ्या मशरूमने इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो.


4) डेअरी प्रोडक्ट - पावसाळ्यात डेअरी प्रोडक्ट जसे की, दह्याचं सेवन अजिबात करू नये. कारण यात बॅक्टेरिया असतात. जे या वातावरणात शरीरासाठी चांगले नसतात.


5) नॉनव्हेज - पावसाळ्यात सामान्यपणे सगळ्यांची पचनक्रिया कमजोर होत असते. त्यामुळे जड अन्न पचन हत नाही. अशात या दिवसात नॉनव्हेज खाणं टाखलं पाहिजे. जास्त चरबी असलेलं आणि रेड मीट टाळलं पाहिजे.


6) सलाद - आरोग्यासाठी फायदेशीर असलेला सलादही या दिवसात टाळला पाहिजे. फक्त सलाद नाही तर पावसाळ्यात कोणतीही कच्ची गोष्ट खाऊ नये. त्याशिवाय कापलेली फळं आणि भाज्यांचं सेवन करू नये. कारण यात कीटक असतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने