Health : 'या' तालुक्यातील लोकांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्राच्या मार्गदर्शनाखाली होणार आरोग्य शिबिर


ब्युरो टीम : नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पग्रस्त खामगाव येथे डोळे येणे व इतर साथीच्या आजारावर एक दिवसीय आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी (८ ऑगस्ट) सकाळी ९ ते दुपारी ३ या काळातही शिबीर होणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता विभाग प्रमुख मंगेश चिवटे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या विशेष सहकार्याने सचिन काळे यांच्या व्यवस्थापनेखाली होणाऱ्या या शिबिरामध्ये विविध साथींच्या आजाराबाबत मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार  करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने