health: मांसाहार न करता या गोष्टींमधूनही मिळतं भरपूर प्रोटीन, शाहाकारी लोकांसाठी बेस्ट पर्याय!

ब्युरो टीम;  शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला प्रोटीन हे पोषक तत्व मिळणं फार गरजेचं असतं. शरीराच्या विकासात प्रोटीनची मोठी भूमिका असते. प्रोटीन शरीरात नवीन पेशी आणि हार्मोन्स तयार करण्याचं काम करतं.

प्रोटीनमुळे शरीरात लाल रक्तपेशीची निर्मिती, सामान्य मेटाबॉलिज्म तयार होतं. पण अनेकांना हेच वाटतं की, प्रोटीन फक्त मांसाहार करूनच मिळतं. मात्र, असं काही नाहीये. प्रोटीन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमधून मिळतं. चला जाणून त्या गोष्टी....

1) बदाम

बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. यात फायबर, व्हिटॅमिन ई, मॅगझीन आणि मॅग्नेशिअम हे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. २८ ग्रॅम बदामांमध्ये १६१ कॅलरीसोबतच ६ ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे तुम्ही बदामाचं नियमित सेवन करून प्रोटीन मिळवू शकता.

2) ओट्स

ओट्स आजकालच्या आहारातील महत्वाचा भाग झालं आहे. यात फायबर, मॅग्नेशिअम, मॅगझिन, थियामिन(व्हिटॅमिन बी १) आणि इतर पोषक तत्वे असतात. अर्धा कप ओट्समध्ये ३०३ कॅलरीसोबत १३ ग्रॅम प्रोटीन असतं. नाश्त्यात तुम्ही याचं नियमित सेवन करू शकता.

3) ब्रोकोली

ब्रोकोली एक फारच आरोग्यदायी भाजी आहे. यातून शरीराला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात मिळतं. याने कॅन्सरसारख्या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो. ब्रोकोलीमध्ये वेगवेगळे बायोअॅक्टिव पोषक तत्वही भरपूर प्रमाणात असतात. एक कप ब्रोकोलीमध्ये केवळ ३१ कॅलरी आणि ३ ग्रॅम प्रोटीन असतं.

4) भोपळ्याच्या बीया\

बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की, भोपळ्याच्या बीया आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात.कारण यात आयर्न, मग्नेशिअम आणि झिंकसहीत आणखीही काही पोषक तत्वे असतात. प्रोटीनबाबत सांगायचं तर २८ ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये १२५ कॅलरीसोबत ५ ग्रॅम प्रोटीन आढळतं.

5) डाळी

डाळींमध्ये प्रोटीन भरपूर असतं. अर्धा कप पिवळ्या किंवा हिरव्या डाळीमध्ये जवळपास 8 ते 9 ग्रॅम प्रोटीन असतं. प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही मूग, मसूर आणि चण्याच्या डाळीचं सेवन करू शकता.

6) हिरवे वाटाणे

हिवाळ्यात प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही हिरव्या वाटाण्याचं सेवन करू शकता. 100 ग्रॅम वाटाण्यांमध्ये 5.4 ग्रॅम प्रोटीन असतं. याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने