Jayant patil : आगामी निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे खटारा चिन्ह कायम राहणार काय?

 

ब्युरो टीम :भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे खटारा(बैलगाडी) हे निवडणूक चिन्ह १९९५ साली निवडणूक आयोगाने गोठवले होते,मात्र पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा केल्यानंतर २०१४ साली विधानसभा निवडणुकीत पक्षाला खटारा चिन्ह मिळाले.त्या निवडणुकीत मिळालेले चिन्ह पुढच्या निवडणुकीत मिळणार का?याबाबत कार्यकर्त्यांत संभ्रम असतो कारण निवडणुक आयोगाचे नियम सातत्याने बदलत असतात.त्यामुळे खटारा चिन्ह शेतकरी कामगार पक्षाला मिळणार काय असा प्रश्न कार्यकर्तेसमोर उभा आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसच्या राजकारणाला विरोध म्हणून झाली.एक राजकीय पर्याय उभा करण्यात आला.शेतकरी कामगार पक्षाची सगळी भिस्त शेतकरी कामगार या श्रमिकांच्यावर होती.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भावणारे चिन्ह म्हणून शेकापने बैलगाडी (खटारा) हे निवडणूक चिन्ह मिळवले.त्यानंतर १९९० पर्यंत शेकापने याच चिन्हावर निवडणुका लढवल्या.

१९९५साली निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवले.२०१० साली नाशिक येथील शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनात पक्षाच्या सरचिटणीस पदाची सूत्रे हाती घेतल्यावर जयंत पाटील यांनी,'पक्षाला खटारा(बैलगाडी) चिन्ह मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार .'असे वचन दिले होते. खटारा चिन्ह मिळवण्यासाठी पाटील यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नाचा भाग म्हणून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत खटारा (बैलगाडी)चिन्ह मिळाले.ते चिन्ह त्याच निवडणुकीसाठी की पुढील सर्व निवडणुकीसाठी याबाबत कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने