Jayant patil :अजित पवार गटातील प्रवेशाच्‍या चर्चेवर जयंत पाटील म्‍हणाले, "मी कुठेही गेलाे तरी..."

 


ब्युरो टीम : राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्‍यक्ष जयंत पाटील अजित पवार गटाकडे वाटचाल सुरु आहे, अशी चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर आज (दि.६) जयंत पाटील यांनी माध्‍यमांशी बाेलताना खुलासा केला.

मी कुठेही गेलो तरी तुम्हाला सांगून जाईन असे सूचक विधान देखील त्‍यांनी यावेळी केले.

या वेळी जयंत पाटील म्‍हणाले की, माझ्यबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. अशा बातम्यांमुळे माझे मनोरंजन होत आहे. मी कोठे जाणार की नाही, याबाबत काहीच सांगितलेलं नाही. माझ्यबद्दल काही अफवा पसरवल्‍या जात आहेत. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे, असंही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

मी कुठेही गेलो तरी तुम्हाला सांगून जाईन

काही जण चुकीची माहिती पसरवत आहेत. मी शरद पवार यांच्‍यासाोबतच आहे. मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटल्‍याच्‍या चर्चाही निराधार आहे, असा दावा करत मी कुठेही गेलो तरी तुम्हाला सांगून जाईन, असे सुचक विधान देखील यावेळी केले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने