job: भारतीय सैन्यात होऊ शकता अधिकारी; जाणून घ्या सविस्तर माहिती

 

ब्युरो टीम:  भारतीय संरक्षण दलाचे भूदल, वायूदल आणि नौदल असे तीन मुख्य प्रकार आहेत. भारतीय सैन्य हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वांत मोठं आणि चौथ्या क्रमांकाचं सर्वांत शक्तिशाली सैन्य आहे.

भारतीय सैन्यात नोकरी करणं आणि सैन्यात भरती होणं ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. भारतीय सैन्यासाठी काम करणारे अधिकारी कमिशन्ड आणि नॉन-कमिशन्ड ऑफिसर्स अशा दोन प्रकारांमध्ये विभागलेले आहेत. लेफ्टनंट अधिकारी हे भारतीय लष्करातल्या कमिशन्ड अधिकाऱ्यांच्या श्रेणीत येतात. त्यांची पदोन्नती आणि वेतनवाढही होते.भारतीय सैन्यात लेफ्टनंट होण्याचे पाच मार्ग : भारतीय तरुण 10+2 आणि पदवीनंतर खालील पाच मार्गांनी भारतीय सैन्यात प्रवेश करू शकतात आणि लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळवू शकतात.- यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एनडीए परीक्षेसाठी नोंदणी करून, पात्रता मिळवून आणि प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट होता येतं.- इंजीनिअरिंग विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रवेश योजनेअंतर्गत सैन्यात भरती होण्याची संधी आहे.- लेफ्टनंट होण्यासाठी, तरुण पदवीधर शेवटच्या वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी सीडीएस परीक्षेत बसतात आणि परीक्षेत पात्र होऊन प्रशिक्षण पूर्ण करतात.- 10+2 दरम्यान विज्ञान पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना इंडियन आर्मी TGC म्हणजेच तांत्रिक पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळू शकते.- या सर्वांव्यतिरिक्त, तांत्रिक प्रवेश योजनादेखील लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात सहभागी होण्याचा एक मार्ग आहे.निश्चित कालावधीत वेतनवाढ आणि पदोन्नतीलेफ्टनंट हा भारतीय सैन्यातला सर्वांत खालचा किंवा सुरुवातीच्या रँकचा अधिकारी असतो.

लेफ्टनंट 40 ते 60 अधिनस्थ किंवा सैनिकांच्या युनिटचा प्रभारी असतो, जे त्याला थेट रिपोर्ट करतात. जे लेफ्टनंट म्हणून काम करतात त्यांना केवळ चांगला पगारच नाही तर आरोग्य विमा, निवास, वाहतूक सूट, पीएफ आणि बरेच आकर्षक भत्ते दिले जातात. याशिवाय, निर्धारित कालावधीत पदोन्नतीदेखील मिळते.भारतीय सैन्यातल्या रँक पदोन्नतीचे निकष : कमिशन मिळाल्यानंतर लेफ्टनंट म्हणून भारतीय सैन्यात गेलेल्या उमेदवारांना दोन वर्षांच्या सेवेनंतर कॅप्टन पदावर बढती दिली जाते. पुढची सहा वर्षं पूर्ण झाल्यानंतर त्यांना मेजर पदावर बढती दिली जाते. यानंतर, वेळोवेळी विहित रँक ऑर्डरनुसार पदोन्नती दिली जाते.लेफ्टनंट : कमिशन मिळाल्यानंतरकॅप्टन : दोन वर्षांनंतरमेजर : सहा वर्षांनंतरलेफ्टनंट कर्नल : 13 वर्षं पूर्ण झाल्यानंतरकर्नल (टीएस) : 26 वर्षं पूर्ण झाल्यानंतरकर्नल : केवळ आवश्यक सेवा अटींच्या पूर्ततेच्या अधीनब्रिगेडियर : केवळ आवश्यक सेवा अटींच्या पूर्ततेच्या अधीनमेजर जनरल : केवळ आवश्यक सेवा अटींच्या पूर्ततेच्या अधीनलेफ्टनंट जनरल एचएजी स्केल : केवळ आवश्यक सेवा अटींच्या पूर्ततेच्या अधीनलेफ्टनंट जनरल एचएजी+स्केल : केवळ आवश्यक सेवा अटींच्या पूर्ततेच्या अधीनव्हीसीओएएस/ आर्मी कमांडर/ लेफ्टनंट जनरल (एनएफएसजी) : केवळ आवश्यक सेवा शर्तींच्या पूर्ततेच्या अधीन आणि निवड आधारावरसीओएएस (सेना प्रमुख) : केवळ आवश्यक सेवा शर्तींच्या पूर्ततेच्या अधीन आणि निवड आधारावरभारतीय सैन्यातल्या रँक्स आणि वेतन :लेफ्टनंट : (लेव्हल 10) 56,100 - 1,77,500 रुपयेकॅप्टन : (लेव्हल 10बी) 61,300 - 1,93,900 रुपयेमेजर : (लेव्हल 11) 69,400 - 2,07,200 रुपयेलेफ्टनंट कर्नल : (लेव्हल 12ए) 1,21,200 - 2,12,400 रुपयेकर्नल : (लेव्हल 13) 1,30,600 - 2,15,900 रुपयेब्रिगेडियर : (लेव्हल 13ए) 1,39,600 - 2,17,600 रुपयेमेजर जनरल : (लेव्हल 14) 1,44,200 - 2,18,200 रुपयेलेफ्टनंट जनरल एचएजी स्केल : (लेव्हल 15) 1,82,200 - 2,24,100 रुपयेलेफ्टनंट जनरल एचएजी+स्केल : (लेव्हल 16) 2,05,400 - 2,24,400 रुपयेव्हीसीओएएस/ आर्मी कमांडर/ लेफ्टनंट जनरल (एनएफएसजी) : (लेव्हल 17) 2,25,000/- रुपये (फिक्स्ड)सीओएएस (सेना प्रमुख) : (लेव्हल 18) 2,50,000/- रुपये (फिक्स्ड)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने