LPG Gass : पंतप्रधान नरेंद्र मोदींची महिलांना रक्षाबंधन भेट "LPG सिलेंडर २०० रूपयाने कमी

ब्युरो टीम: ओणम आणि रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर मोदी सरकारनं महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला एक मोठा दिलासा आहे. सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात २०० रुपयापर्यंत कपात केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात गॅस सिलेंडर दर कपातीला मंजुरी मिळाली आहे.

त्यामुळं आता घरगुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. खरं तर सरकारची २०० रुपयांची सब्सिडी उज्ज्वला योजनेतंर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आभार मानलं आहेत.

निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलं, "आज सर्वत्र ओणम साजरा केला जात आहे आणि रक्षाबंधन २०२३ च्या मुहुर्तावर मंत्रिमंडळाने सर्व घरगुती स्वयंपाकाच्या गॅस LPG सिलेंडरची किंमत २०० रूपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी. या प्रसंगी तुमच्या बहिणी आणि मातांना हा 'स्नेह उपहार' (स्नेह भेट) दिल्याबद्दल." ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये १०० रुपये कपात केली होती. परंतु घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल झाला नव्हता.



दरम्यान, केंद्र सरकारने हे स्पष्ट केलं आहे की, घरगुती गॅस सिलेंडरवरील ही सब्सिडी केवळ उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार आहे. इतर अन्य घरगुती गॅस सिलेंडरवर ही सब्सिडी लागू नसेल. उज्ज्वला योजनेतंर्गत केंद्र सरकार याआधी २०० रुपये सब्सिडी देत होते. त्यात आता अतिरिक्त २०० रुपये सब्सिडी मिळणार आहे. उज्ज्वला योजनेत लाभार्थ्यांना एकूण १ वर्षात १२ घरगुती गॅस सिलेंडरवर सब्सिडीचा लाभ घेता येऊ शकतो.


LPG गॅस सिलेंडरचे सध्याचे दर

ऑगस्ट महिन्यात राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचे दर ११०३ रुपये इतके होते. तर मुंबईत सिलेंडरचे दर ११०२ रुपये, कोलकातामध्ये ११२९ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये होते. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजीच्या दरात बदल करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेतंर्गंत घरगुती गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.






0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने