megha dhade join BJP: 'बिग बॉस मराठी' फेम मेघा धाडेची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती; अभिनेत्री म्हणाली, "अनेक कलाकारांना पक्षाशी जोडण्याचे काम करेन

ब्युरो टीम: अभिनेत्री मेघा धाडेबिग बॉस मराठी मधून घराघरात पोहोचली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची ती विजेती ठरली होती. मेघाचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मेघाने काही दिवसांपूर्वीच राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. तिने जून महिन्यात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. आता भाजपाने मेघावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

मेघाची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मेघाने ही माहिती चाहत्यांना दिली आहे. "आज माझी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेश महामंत्री माननीय विजयजी चौधरी, माझी लाडकी सांस्कृतिक प्रकोष्ठची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा प्रियाताई बेर्डे यांच्या उपस्थितीत माझी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच माझ्याबरोबर अनेक कलाकारांचे पक्षप्रवेश करण्यात आले. मला प्रिया ताईनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडून अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून जोमाने काम करीन हा जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार...", असं मेघाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अनेक मराठी कलाकार राजकारणात सक्रिय आहेत. नुकतंच अभिनेता अभिजीत केळकरने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करत राजकारणात एन्ट्री घेतली आहे. तर सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे भाजपाच्या सांस्कृतिक प्रकोष्ठच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने