Nacc:कारवाईचा दट्ट्या बसताच सुधारली महाविद्यालये; 'नॅक' मूल्यांकनामध्ये महाराष्ट्र आघाडीवर, गुजरात पाचव्या स्थानी

 

ब्युरो  टीम: ज्यातील ३५ विद्यापीठे आणि १ हजार ९२२ महाविद्यालये अशा एकूण १ हजार ९५७ उच्च शिक्षण संस्थांचे नॅक मूल्यांकन पूर्ण झाले असून, महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

देशातील ४३० विद्यापीठे आणि ९ हजार २५७ महाविद्यालये अशा एकूण ९ हजार ६८७ शैक्षणिक संस्थांचे नॅक मूल्यांकन पूर्ण झाले आहे.

उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढावी, यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन बंधनकारक केले आहे. त्यानुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन तसेच पुनर्मूल्यांकन करून घ्यावे, याबाबत उच्च शिक्षण विभागातर्फे वारंवार परिपत्रक काढून सूचना करण्यात येत हाेत्या. मात्र, त्याकडे उच्च शिक्षण संस्थांनी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले हाेते.


शिक्षण विभागाच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे नॅक मूल्यांकनात राज्य आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. नॅक मूल्यांकन प्रक्रिया न करणाऱ्या महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्यात येतील, असा इशारा सरकारने दिला होता.


सर्वाधिक नॅक मूल्यांकन

राज्य विद्यापीठ महाविद्यालय संख्या

महाराष्ट्र ३५ १९२२ १९५७

कर्नाटक ३४ ९९४ १०२८

तामिळनाडू ४५ ८५९ ९०४

उत्तर प्रदेश ३९ ६१७ ६५६

गुजरात २७ ५०० ५२७

प. बंगाल १७ ४११ ४२८

आंध्र प्रदेश १६ ४०३ ४१९

नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यासंदर्भात विद्यापीठाने काय कारवाई केली ? याबाबत राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

- डाॅ. शैलेंद्र देवळाणकर, प्रभारी शिक्षण संचालक, उच्च शिक्षण विभाग

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने