Narendra modi : मला मिळालेला 'लोकमान्य टिळक पुरस्कार' 140 कोटी जनतेला समर्पित - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 


ब्युरो टीम : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2023 नं सन्मानित करण्यात आलं आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणेरी पगडीने पंतप्रधान मोदींचा सन्मान करण्यात आला. यावेळी हा पुरस्कार मी 140 कोटी जनतेला समर्पित करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी संबोधित केलं. मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असा दिवस आहे. मी येथे येऊन जेवढा उत्साहित आहे, तितकाच भावूक सुद्धा आहे. आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. तसेच अण्णाभाऊ साठेंची जन्मजयंतीही आहे. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्याच्या इतिहासातील कपाळावरील टिळ्याप्रमाणे आहेत. तसचे अण्णाभाऊ साठेंनी समाज सुधारणेसाठी जे योगदान दिलं, ते अप्रतिम आहे. या दोन्ही महापुरुषांच्या चरणी मी श्रद्धा अर्पण करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले

या महत्त्वाच्या दिवशी पुण्याच्या या पावन भूमीवर, महाराष्ट्राच्या भूमीवर येण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे. ही पुण्यभूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ही चाफेकर बंधूंची पवित्र भूमी आहे. या भूमीवर ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडले गेले आहे. मी दगडूशेठ गणपतीचा आशीर्वाद घेतला. दगडूशेठ हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी टिळकांच्या आवाहानानंतर गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी सहभागी झाले होते. आज पुण्यात ज्याप्रकारे मला सन्मान मिळालाय, हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

जी जागा आणि संस्था टिळकांशी जोडली गेलेली आहे. त्याच माध्यमातून हा पुरस्कार मिळणं माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. काशी आणि पुणे या दोघांची विशेष ओळख आहे. विद्ववत्ता येथे अमर आहे. पुणे नगरी विद्वत्तेची दुसरी ओळख आहे. जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो, त्यानुसार आपली जबाबदारी वाढते. ज्या पुरस्काराशी टिळकांचं नाव जोडलं गेलंय, त्याचं दायित्व मोठ्या प्रमाणात वाढतं. मी लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्डला 140 कोटी जनतेला समर्पित करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मी जनतेला विश्वासही देतो की, त्यांची सेवा, आशा, आकांशा यांच्यामध्ये कमी पडू देणार नाही. ज्यांच्या नावात गंगाधर आहे. त्यांच्या नावे मिळालेल्या या पुरस्कारासोबत जी रक्कम मला देण्यात आली आहे. ती रक्कम नमामि गंगे प्रकल्पासाठी देणार, असंही मोदी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने