Narendra modi :दगडूशेठ मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान



ब्युरो टीम : पुण्यातील दगडूशेठ मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. भारताचे राष्ट्रपती ते माजी पंतप्रधान आणि अनेक मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दगडूशेठ गणपती मंदिराला भेट दिली होती.

पुण्यातील दगडूशेठ मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. भारताचे राष्ट्रपती ते माजी पंतप्रधान आणि अनेक मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दगडूशेठ गणपती मंदिराला भेट दिली होती.

परंतु, नरेंद्र मोदी हे पहिले आहेत, ज्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. गणपती बाप्पासमोर नतमस्तक होत पंतप्रधान मोदी यांनी अभिषेक, पूजन केले.

यापूर्वी अनेक दिग्गजांनी दगडूशेठ मंदिराला भेट दिली आहे. फखरुद्दीन अली अहमद यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून भेट दिली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, चंद्रशेखर आणि इंद्र कुमार गुजराल हे पंतप्रधान नसताना मंदिरात आले होते. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दगडूशेठ मंदिराला भेट दिली होती. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनीही नुकतीच मंदिरात पूजा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना आज सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण राज्याचं लक्ष आज पुण्याकडे लागलेलं आहे. हा कार्यक्रम अराजकीय असला तरीही अनेक राजकीय नेते या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने आजचा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने