Narendra Modi : पुणे जिल्ह्यात उभारणार मोदींचा 'स्टेच्यू ऑफ युनिटी'पेक्षा मोठा पुतळा; ठिकाण लवासा, कारण...

 

ब्युरो टीम : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक पुतळा पुणे जिल्ह्यातील लवासा येथे उभारण्यात येणार आहे. मोदींचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा असणार आहे. या पुतळ्याची उंची १९० ते २०० मिटर असणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याची उभारणी याचवर्षी ३१ डिसेंबर २०२३ च्या आधी होणार आहे. लवासाला भेट देणाऱ्या लोकांसाठी मोदींचा पुतळा विशेष आकर्षण ठरणार आहे. पुतळा अनावरणाच्या वेळी संयुक्त राज्य अमेरिकाचे वाणिज्य दुतावासाचे प्रतिनिधी, इस्राईल, जर्मनी, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात, साउदी अरब दुतावासाचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.

मोदींचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यासाठीची जबाबदारी डार्विन प्लेटफॉर्म ऑफ ग्रुप कंपनीजला देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे प्रमुख अजय हरिनाथ सिंग यांच्यानुसार, भारत देश लवासामधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भव्य पुतळा उभारणीचा साक्षीदार होण्यास सज्ज झाला आहे.

देशात आतापर्यंत गुजरातमध्ये असलेला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातील सर्वात उंच पुतळा मानला जातो. या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नेशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने डार्विन प्लेटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीला पुतळा उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. हा पुतळा लवासा स्मार्ट सिटीच्या संकल्पनेतील महत्त्वपूर्ण टप्पा सिद्ध होईल, असा दावाही हरिनाथ सिंह यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने