Narendra Modi : पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला डावललं; मोदींचं विधान



ब्युरो टीम : आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षाची आघाडी इंडिया जोमाने कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील खासदारांची दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.

एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाचा उल्लेख केला. उद्धव ठाकरेंनी आपल्यासोबत असलेली युती तोडली. आम्ही तोडली नाही. भाजप काँग्रेसप्रमाणे अहंकारी नाही. तसेच भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तेतून पायउतार होणार नसल्याचं मोदींनी म्हटल्याचं सुत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्र सदनात पार पडलेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील खासदार उपस्थित होते. यावेळी मोदींनी एनडीएचा २५ वर्षांचा दाखला देताना नितीश कुमार, लालू यादव, ममता बॅनर्जी आपल्यापासून दूर गेल्याचं म्हटलं. तसेच शिवसेना आपल्यापासून दूर गेली. आपण त्यांच्यापासून दूर गेलो नसल्याचंही मोदींनी म्हटलं. आपली युती फक्त निवडणुका पुरती नाही ही भावनिक युती आहे. आपली युती 25 वर्षापेक्षा जास्त, ती अभेद्य राहावी. आता खासदारांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. तसेच सत्तेत सगळ्यांचा समसमान वाटा असेल, असंही मोदींनी म्हटलं. दरम्यान अनेक नेत्यांमधे क्षमता असताना त्यांना पंतप्रधान होता आलं नाही. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला डावललं गेल्याचा दावा मोदींनी यावेळी केला



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने