Naresh mhaske : "आज ट्रिपल बार! सकाळच्या भोंग्याच्या कानठळ्या बसणार, पवारांची राष्ट्रवादी.", नरेश म्हस्केंचं सूचक ट्वीट

 

ब्युरो टीम : आज आम्ही ट्रिपल बार उडवणार असं म्हणत शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रात २१ जून २०२२ या दिवशी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. थेट उद्धव ठाकरेंनाच त्यांनी आव्हान दिलं.

पुढे ही लढाई सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाच्या दारातही गेली. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं धनुष्य बाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यानंतर शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. काही दिवसांपूर्वीच नीलम गोऱ्हेही शिवसेनेत आल्या. ठाकरे गटासाठी हा मोठा झटका मानला जातो आहे. अशात आता नरेश म्हस्के यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

काय म्हटलं आहे नरेश म्हसकेंनी?

आज तर आम्ही ट्रिपल बार उडवणार!! सकाळच्या भोंग्याच्या कानठळ्या बसणार. शरद पवारांची राष्ट्रवादी आणखी विरळ होणार. उबाठातले तर शिल्लकही संपणार. ही आहे विचारांची ताकद, ही आहे कार्यक्षमतेची पावती, ही आहे उज्ज्वल भविष्याची नांदी!! हे ट्वीट नरेश म्हस्के यांनी केलं आहे.

नरेश म्हस्केंच्या या ट्वीटचा अर्थ ठाकरे गटातले आणखी काही नेते हे शिवसेनेत येणार हे उघड आहे. सकाळचा भोंगा असा उल्लेख संजय राऊत यांचा केला जातो. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती शिवसेनेत येऊ शकतात. तसंच राष्ट्रवादी विरळ होणार असंही म्हटलं आहे. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. कारण २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीतही शरद पवार गट आणि अजित पवार गट पडले आहेत. शरद पवार गटही विरळ होणार असं आता नरेश म्हस्केंनी म्हटलं आहे.

आता आज शिवसेनेत काही प्रवेश होणार आहेत हे सरळ आहे. मात्र त्यामुळे शरद पवार गट विरळ कसा होणार आणि संजय राऊत, तसंच उद्धव ठाकरेंना झटका कसा बसणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने