ब्युरो टीम:मष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल बीडमध्ये प्रचंड मोठी सभा घेतली. या सभेला लाखभर लोक उपस्थित होते. अगदी कमी वेळात शरद पवार यांनी घेतलेल्या या सभेला सर्वच वयोगटातील लोक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
पवार यांच्या या सभेमुळे अजितदादा गटात खळबळ उडाली आहे. स्वत: कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनाही या सभेने टेन्शन आलं आहे. केवळ सभेनेच नव्हे तर आणखी एका कारणाने धनंजय मुंडे यांना टेन्शन आलं आहे. ते म्हणजे बबन गित्ते. बबन गित्ते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलून जाणार आहेत.
बबन गित्ते यांनी काल परळीत मोठं शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. जवळपास एक हजार वाहनांच्या ताफ्यासह बबन गित्ते हे सभा स्थळी आले होते. त्यावरून गित्ते यांच्यामागे परळीतील मोठी जनशक्ती असल्याचं स्पष्ट झालं आहे. शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून गित्ते यांना बळ दिलं आहे. त्यामुळे गित्ते यांचं बीडच्या राजकारणातील वजन अधिकच वाढलं आहे. आता मुंडे बहीण-भावाच्या लढतीमध्ये गित्ते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात आता बबन गित्तेंच्या माध्यमातून नवा पर्याय उपलब्ध झालाय. त्यामुळेच आता धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा