PM Modi Pune Visit : शरद पवारांनी हसून मोदींच्या पाठीवर मारली थाप; चर्चा तर होणारच



ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुणे दौऱ्यात एकाच व्यासपीठावर झालेल्या भेटीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. शरद पवार  आणि नरेंद्र मोदींची ज्या पद्धतीने व्यासपीठावर भेट झाली, व यावेळी दोघांमध्ये झालेला संवाद आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. आता यासर्व प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले होते. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी व्यासपीठावर पोहोचल्यानंतर सर्वात आधी शरद पवारांच्या जवळ गेले. तेव्हा पवारांनी हस्तांदोलन करीत मोदींचे स्वागत केले. यावेळी क्षणभर दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली अन् शरद पवारांनी हसून मोदींच्या पाठीवर थाप मारली. या दोघांमध्ये काही सेकंदाकरता चर्चा झाली असली तरी या चर्चेमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

पहा व्हिडिओ




0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने