भारताने जगात उल्लेखनीय कामगिरी करत चंद्रयान ३ चं यशस्वी लँडींग केलं, या मोहिमेत सहभागी वैज्ञानिकांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रीसहून थेट बंगळुरू गाठले आणि इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये शास्त्रज्ञांची भेट घेतली. पंतप्रधानांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना सलाम केला आणि या मोहिमेसाठी त्यांचे अभिनंदन केले. मोदी म्हणाले, "आपण काय केलं हे देशवासीयांना कळलं पाहिजे. हा प्रवास सोपा नव्हता. मून लँडरचे सॉफ्ट लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी एक आर्टिफिशियल देखील बनवलं. विक्रम लँडरवर उतरून त्याची चाचणी घेण्यात आली. लँडर पोहोचला आहे. तिथे जाण्यासाठी खूप परीक्षा दिल्या, त्यामुळे यश मिळणार हे निश्चित होत, असे या प्रसंगी मोदींनी म्हटले.
२३ ऑगस्ट रोजी चंद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केलं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस (२३ ऑगस्ट) राष्ट्रीय अंतराळ दिवस (National Space Day) म्हणून साजरा करण्याची मोठी घोषणा केली. २३ ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकावला, तो दिवस भारत राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करेल, हा दिवस आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील, असेही मोदींनी म्हटले. यावेळी, भाषण करताना मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
टिप्पणी पोस्ट करा