priyanka gandhi: भाजपची डोकेदुखी वाढणार ; प्रियंका गांधी मैदानात उतरणार, या जागांची होतेय चर्चा?

 

ब्युरो टीम: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचदरम्यान, उत्तर प्रदेशात नाममात्र उरलेल्या काँग्रेसने आपले गतवैभव प्राप्त करण्यासाठी कंबर कसली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा जनाधार मिळवण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. तसेच प्रियंका गांधींना उत्तप प्रदेशमधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू आहे. त्यासाठी मतदारसंघांचा प्राधान्यक्रम ठरण्यात आला असून, त्यात फूलपूर पहिल्या, प्रयागराज दुसऱ्या आणि वाराणसी तिसऱ्या स्थानी आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशमधीन दोन अन्य मतदारसंघांचीही चाचपणी सुरू आहे. त्या मतदारसंघांशी जवळचं नातं आहे.


या पाच मतदारसंघांची संपूर्ण आकडेवारी तयार करून केंद्रीय कार्यालयाला पाठवण्यात येईल. या जागांवर विजयाची शक्यता अधिक असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यासाठी पक्ष अंतर्गतरीत्या या मतदारसंघांमध्ये सर्व्हेही करणार आहे. फूलपूर येथून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू निवडणूक लढले होते.

उत्तर प्रदेशात गेल्या काही वर्षांत काँग्रेसचा जनाधार मोठ्या प्रमाणावर घटला आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात २० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र २०१४ मध्ये काँग्रेसला केवळ २ जागा जिंकता आल्या होत्या. तर २०१९ मध्ये केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यात अमेठी येथून राहुल गांधींचाही पराभव झाला होता.

दुसरीकडे ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या आघाडीसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. बैठकीचा अजेंडा तयार झाला असून, या बैठकीतूनच आघाडीच्या अध्यक्षाच्या नावावरही चर्चा होणार आहे. तसेच या बैठकीत इंडिया आघाडीसाठी एक ध्यजही निश्चित करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने