PUNE UNIVERSITY: विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार कैलास पाटील यांनी घेतली कुलगुरू यांची भेट


 ब्युरो टीम:आज आमदार कैलास पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधील वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांसोबत आदेश कॅन्टीन येथे मुक्त संवाद साधला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या. या संवादामध्ये प्रामुख्याने वसतिग्रह संबंधित जास्त तक्रारी विद्यार्थीनी केल्या. सध्या विद्यापीठांमध्ये प्रथम वर्षाचे प्रवेश चालू आहेत , अनेक विद्यार्थ्यांना वसतिग्रह मिळालेले नाहीत. वसतीगृह अभावी बहुतेक विद्यार्थी आपला प्रवेश रद्द करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. विद्यार्थ्यांच्या संवादानंतर कैलास पाटील यांनी युवासेनेच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांच्या समवेत माननीय कुलगुरू सुरेश गोसावी यांचे भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती सविस्तर चर्चा झाली . लवकरच वसतिगृह प्रश्नांबरोबरच विद्यापीठातील इतर अनेक प्रश्नांना घेऊन युवासेना तीव्र धरणे आंदोलन करणार आहे. 

प्रमुख मागण्या -

1) सिनेट पदवीधर निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार केंद्रावर झालेल्या बोगस मतदान प्रकरणी संबंधित दोन्ही मतदान केंद्रावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. 

2) अल्युम्नी असोसिएशन या ठिकाणी विशिष्ट एका पक्ष व संघटनेला बैठकीस परवाणगी देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. 

3) विद्यापीठामधील सर्व मेस , रिफेक्ट्री , फुडमॉल याची टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. 

4) अनिकेत कॅन्टीन तात्काळ सुरू करण्यात यावी. म्हणजे विद्यार्थची गैरसोय होणार नाही. 

5) रॅप सॉंग प्रकरणी जी समितीचे गठीत करण्यात आली आहे त्या समितीने तयार केलेला अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा. 

6) विद्यार्थ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या वसतिग्रह प्रमुख विकास मठे , सुबोध मंडलीक, आणि कोळेकर यांची हकालपट्टी करण्यात यावी. 

7) समान संधी केंद्र स्थापन करण्यात यावे. 

8) भोजनगृह समिती गठीत करण्यात यावी 

इ. मागण्या घेऊन युवासेना लवकरच आंदोलन करत आहोत. वरील निवेदन व चर्चा करत असताना आमदार कैलास पाटील यांच्या सोबत युवासेना पदाधिकारी, तसेच विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये युवासेना पूणे शहर प्रमुख मा. राम थरकुडे, युवराज पारीख, नारायण चापके , प्रतिक दगडे, सागर दळवी, अक्षय माळकर, रोहित कदम , ,सोहम जाधव, अंकित अहिरे,  इतर युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने