rajnikanth: 'जेलर'चा धुमाकूळ! बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत 75 कोटींचा गल्ला

 

ब्युरो टीम: सुपरस्टार रजनीकांत 'थलैवा'ची जादू अजूनही कायम असल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जेलर' चित्रपटाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. 'जेलर'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल 52 कोटी, तर दुसऱया दिवशी 27 कोटी अशी दोन दिवसांत एकूण 75.35 कोटींची रग्गड कमाई केली आहे.

कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात तर 'जेलर' हा पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे.

'थलैवा'वर चाहत्यांचे अजूनही प्रेम असल्याने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटगृहांजवळील पोस्टरला अनेक ठिकाणी दुग्धाभिषेक करीत स्वागत करण्यात आले. यावेळी रजनीकांत यांच्या नावाचाही जयजयकार करण्यात आला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल पाच विक्रम मोडीत काढले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 'जेलर'ने तामीळनाडूत 23 कोटी, कर्नाटकमध्ये 11 कोटी, केरळमध्ये 5 कोटी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून 10 कोटी व इतर राज्यांतून तीन कोटींची कमाई केली आहे. दुसऱया दिवशीही 'जेलर'ला तुफान प्रतिसाद मिळाल्यामुळे हा चित्रपट तिसऱया दिवशीच 100 कोटींच्या कमाईचा टप्पा गाठेल असा विश्वास सिनेतज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने