Ravikant tupkar : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता आणखी एक पक्ष फुटीच्या वाटेवर?

 


ब्युरो टीम : आता आणखी एक पक्ष फुटीच्या वाटेवर आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर रविकांत तुपकर यांनी दावा केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आमची कार्यकर्त्यांचीच आहे.

वीस वर्षे आम्ही संघटनेत काम करतोय, असं तुपकर यांनी म्हटलं आहे. आज रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली परखड भूमिका मांडली. यावेळी बोलताना त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर दावा केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

माध्यमांशी बोलताना देखील त्यांनी अशीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान दुसरीकडे रविकांत तुपकरांच्या भूमिकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खळबळ उडाली आहे. रविकांत तुपकर यांच्या या वक्तव्यानंतर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता रविकांत तुपकर वेगळी भूमिका घेण्याआधीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून त्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत राजू शेट्टी मोठा निर्णय घेण्याची शक्यात आहे.दरम्यान गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केले, त्यामुळे राष्ट्रवादीत देखील मोठी फूट पडली आणि आता रविकांत तुपकर हे बंडाच्या तयारीत आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पक्षातंर्गत संघर्ष पहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होते आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने