Sachin Tendulkar : 'क्रिकेटचा देव', म्हणाला- मला तुझी बॉलिंग बघायचीये..सैयामी खेरच्या नवीन सिनेमाला लावली हजेरी

 

ब्युरो टीम; अभिषेक बच्चन आणि संयमी खेर यांची मुख्य भूमिका असलेला 'घुमर' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक जण सिनेमाचं कौतुक करताना दिसतोय. मुंबईत सिनेमाची स्क्रीनिंगही आयोजित केली गेली.

यासाठी क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. नुकतंच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने संयमीची भेट घेत तिची गोलंदाजी बघायची इच्छा व्यक्त केली. खुद्द सचिन तेंडुलकरकडून कौतुक होतंय हे पाहून संयमीही भारावली. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

'घूमर' सिनेमा पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरला संयमीचं काम खूपच आवडलं. फक्त एका हाताने संयमी कशी खेळली असेल याचं त्याला कुतुहल वाटत होतं. सिनेमात पाहिलं पण प्रत्यक्षातही त्याला तिची बॉलिंग पाहण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने संयमीची भेट घेत तिला बॉलिंग टाकायला सांगितली. त्यांच्या भेटीचा किस्सा संयमीने सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. आपण पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरतं तेव्हा काय आनंद होतो तो तिने मांडला आहे. तसंच सचिनसमोर बॉलिंग करतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने