Seema haidar : सीमा हैदरला लोकसभा निवडणूक लढवणार, रिपाईंत सामील होण्याचे आठवलेंचे निमंत्रण स्वीकारले

 


ब्युरो टीम : पाकिस्तानातून आपल्या नवऱ्याला सोडून पळून आलेल्या सीमा हैदर हिला आता राजकारणात येण्याचे वेध लागले आहेत. सीमाला मिळालेल्या अपार प्रसिद्धीमुळे तिच्या वाट्याला एक चित्रपट आला असून आता तिला राजकारणात येण्याचाही रस्ता सापडला आहे.

भाजपचा पक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या रिंपाईंने सीमाला आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण दिले आहे. सीमाने तत्काळ हे निमंत्रण स्वीकारले आहे. रिपाईंने सीमा हिला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा निर्णयही जाहीर करून टाकला आहे.

रिपाईंच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की सीमा हैदर हिला महिला आघाडीचे अध्यक्षपद दिले जाणार आहे. इतकेच नाही तर तिची बोलण्याची शैली आणि कला पाहून तिला प्रवक्ताही बनवले जाणार आहे. आठवलेंच्या पक्षातर्फे सीमा हैदर हिला आपल्या पक्षाच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरवले जाणार असल्याचेही या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तपास यंत्रणांकडून सीमा हिला केव्हा क्लीन चीट मिळते याची आता रिपाईं वाट पाहात आहे.

रिपाईंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी याबाबत बोलताना म्हटले की सीमा हैदर ही पाकिस्तानी नागरीक असून ती हिंदुस्थानात आली आहे. जर सुरक्षा यंत्रणांनी सीमाला क्लीन चीट दिली तर तिला हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळेल. तसं झालं तर सीमाचे आमच्या पक्षात स्वागत असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसार ज्याला हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळते तो कुठूनही निवडणूक लढवू शकतो. मासूम यांनी पुढे म्हटले की जर सीमाला क्लीन चीट मिळाली, तिच्यावरील सगळे आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाले तर आम्ही तिला प्रवक्ता बनवू.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने