sharad pawar: अजितदादा आमचेच, शरद पवारांचे विधान, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया ?

 

ब्युरो टीम: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं सांगून राजकीय धुरळा उडवून दिला आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

शरद पवार यांच्या या विधानामागे काय खेळी आहे? असा सवालही केला जात आहे. भाजपने तर राष्ट्रवादीत फूट पडलीय असं वाटत नसल्याची प्रतिक्रिया देऊन या संभ्रमात आणखी भर घातली आहे. हा सर्व धुरळा उडालेला असतानाच ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठं विधान केलं आहे.

निवडणूक आयोगासाठी तसेच पक्ष, पक्षाची घटना आणि नेतृत्व वाचवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केलं असावं, असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण शरद पवार यांच्या विधानामुळे नेतृत्वात नाही, पण कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम होत असतो. हे सत्य आहे. ते नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण होतोय, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने