Sharad Pawar :ते चार वेळा निवडून आलेत मी चार वेळा मुख्यमंत्री होतो - शरद पवार

 

ब्युरो टीम: कोण बच्चू कडू ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेत तर मी चार वेळा मुख्यमंत्री होताे अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत फटकारले.

पवार यांची येथील एका हॉटेलवर पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना बच्चू कडू यांनी त्यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, की मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळा मुख्यमंत्री होता. केंद्रात अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. तुम्ही कुणीही काही आरोप केले की विचाराला. तेव्हा पत्रकारांनी 'ते चार वेळा आमदार होते, अपक्ष निवडून आले होते.' असे प्रत्युत्तर दिले. तेव्हा पवार यांनी 'ते चार वेळा आमदार होते, तर मी चार वेळा मुख्यमंत्री होता' असे सांगून विषय संपवला.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने