shivsena: विद्यार्थी प्रश्नांवर आंदोलनाला यश; शिवसेनेच्या विद्यार्थीसेना व विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने केले होते आंदोलन

ब्युरो टीम: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया नंतरही गेली ५०दिवस झाले वसतिगृह त्यांना उपलब्ध करून दिले जात नव्हते  यासाठी शिवसेनेच्या विद्यार्थीसेना व विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला प्रतिदास देत विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 


 विद्यापीठातील मार्गदर्शन केंद्राची जाहिरात विद्यापीठाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर देऊन परीक्षेच्या मार्फत व गुणवत्तेनुसार निवड करण्यात येते त्यांना सुविधा विद्यापिठामार्फत उपलब्ध केल्या जातात परंतु या वर्षी वसतिगृह नाकारण्यात आले यामुळे विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केली असता त्यांनी योग्य निर्णय न दिल्याने काल कुलगुरु डॉ. गोसावी सरांच्या कार्यालया बाहेर विद्यार्थी व समविचारी संघटनांकडून ठिय्या आंदोलन सुरू केले व ज्यांना हॉस्टेल ( वसतिगृह ) दिले गेले नव्हते अशा ४४ विद्यार्थ्यांना  उपलब्ध करून दिले याचे आदेश सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु यांनी दिले.

गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या हक्काच्या लढ्याला विविध संघटना प्रतिनिधीच्या प्रयत्नाने यश मिळाले. विद्य्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप समाधान झाले त्यांच्या हक्का साठी त्यांच्या सोबत काल काही वेळ सहभागी होतो.  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. गोसावी सरांचे आभार त्यांनी तातडीने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला. म्हणून युवासेना पुणे शहराचे नेते राम थरकुडे व विद्यार्थी  संघर्ष कृती समितीचे राहुल ससाणे व तुकाराम शिंदे यांनी कुलगुरु डॉ. गोसावी यांचा बाळासाहेंबाचा फोटो व शाल देऊन आभार व्यक्त केले. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने