Social work : सुनील काका यादव : समाजसेवेतच खरे जीवनाचे समाधान

 

  ब्युरो टीम : प्रत्येक व्यक्तीला जीवनात काही तरी छंद असतो. लोकांना वाचणे, गायन, नृत्य, खेळ, चित्रे काढणे, रंगीबेरंगी दगडे, गोट्या गोळा करणे असे अनेक छंद असतात. एखादा छंद आयुष्याला दिशा देतो. असाच एक आगळावेगळा अनोखा छंद जोपासून सोशल मीडिया मार्फत ज्यांची ओळख महाराष्ट्रातील गावागावात निर्माण झाली आहे असे कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील सामजिक कार्यकर्ते "सुनील काका यादव" होय. काकांचा छंद निःस्वार्थी पणे लोकांची सेवा करणे हा आहे."काका नेहमीचं अडलेल्या, नडलेल्या व चक्रव्यूहात पडलेल्या लोकांसाठी आधारस्तंभ बनले आहेत." जे काम वर्षांनुवर्ष रखडले आहे.काही कामचुकार अधिकारी गरिबांच्या कामाकडे दुर्लक्ष करतात ते काम सूनिल काका यादव यांच्या एका फोनने पटकन मार्गी लागते."हॅलो मी सुनिल काका यादव बोलतोय" असा आवाज ऐकताच भले भले अधिका-यांना कापरा भरतो. काही अधिकारी लोकांची कामे पटपट करतात त्यांचे व सुनिल काकांचे संबध हे कायमंच प्रेमाचे राहिलेले आहेत. पण कामचुकार, भ्रष्ट अधिकाऱ्यानां सुनिल काका त्यांच्या स्टाईलने लोकांची कामे करण्यास भाग पडतात. कोणाला कसलीही अडचण आल्यास लोकं काकांना फोन करतात. शेतकऱ्यांना वीज समस्या, पीक नुकसान भरपाई असो, किंवा कोणाची दवाखाना संदर्भात, विद्यार्थीनां शाळेची अडचण निर्माण झाल्यास लोकं सुनिल काकांना फोन करतात काका लगेचच संबधित अधिकाऱ्यानां विडीओ कॉल करतात.कॉल रेकॉर्डिंग करुन फेसबुकवर टाकला जातो. सुनील काकांच्या या कामाच्या पद्धतीमुळे लोकांची कामे पटपट होतात. लोकांना आता सुनिल काका हे "लोक न्यायालय" वाटू लागले आहे.

काका हे दिवस-रात्र न थकता निःस्वार्थीपने लोकांच्या कल्याणाकरिता तन, मन, धन अर्पुण काम करतात. लोकांची कामे झाल्यावर लोकं काकांचा सत्कार करून काकांना भरभरून आशीर्वाद देतात. लोकांची अडलेली कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील दिसणारा आनंद हेच सुनिल काकांना नवीन कामे करण्यास प्रेरणा व शक्ती देते."समाजसेवेतच खरे जीवनाचे समाधान आहे असे काका नेहमीं म्हणतात." 


लेखक - महेंद्र मिसाळ (व्याख्याता व लेखक)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने