Sudhir munguntiwar:सुधीर मुनगंटीवार यांचा गौप्यस्फोट; दहशतवाद्यांचा घातपात घडवण्याचा होता डाव?

 


ब्युरो टीम : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दहशतवाद्यांकडून इतर नेत्यांना धमकीचे फोन येत आहेत. तसेच आपल्यासोबत घातपात घडवण्याचा मोठा कट देखील आखण्यात आला होता, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

माझ्यापण गाडीचे नट बोल्ड लूज केले होते. अपघात घडवण्याचा कट होता. पण मी मीडियाकडे गेलो नाही. असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही सुनावले.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "माझ्यापण गाडीचे नट बोल्ड लूज केले होते. अपघात घडवण्याचा कट होता. पण मी मीडियाकडे गेलो नाही. माझ्या गाडीचे सर्व नटबोल्ट काढले होते. मी कंपनीत विचारले तर ते म्हणाले, असं कधीच होऊ शकत नाही. भाजपच्या अनेक नेत्यांना अशी धमकी येते. आता ATS ने पण सांगितले आहे की, सावध रहा. आम्हाला सूचना केल्या. कोणतीही लिंक आली की त्या ओपन करायची नाही. याची आम्हाला भीती नाही पण काळजी घ्यायला हवी. दहशतवाद विरोधी पथकाने सर्वांना सांगितले आहे. विरोधकांना पण सांगितले आहे." असं ते म्हणाले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने