sunil gavskar: भारत लवकरच क्रीडा राष्ट्र म्हणून ओळख मिळवेल - सुनील गावसकर

 

ब्युरो टीम: सध्या क्रीडा विश्वात भारताचाच आवाज घुमतोय. मग तो खेळ बुद्धिबळ असो किंवा अॅथलेटिक्स. त्यांच्या कामगिरीने अवघा देशच नव्हे, तर महान फलंदाज सुनील गावसकरही भारावले आहेत. तो दिवस आता फार दूर नाही. येत्या 10-15 वर्षात हिंदुस्थान क्रीडा राष्ट्र म्हणून ओळखला, जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना गावसकर यांनी दिलखुलास उत्तरे दिली. नीरज चोप्राच्या सोनेरी झळाळीमुळे त्यांच्या चेहऱयावर अभिमानाचे भाव दिसत होते. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी मोजक्याच खेळांची चर्चा व्हायची आणि त्याच खेळांना प्रसिद्धी मिळायची. मात्र आता जमाना बदललाय. आता त्या खेळांचीही चर्चा होतेय आणि त्यांनाही पुरेशी प्रसिद्धी मिळतेय. या खेळांनी आम्हाला नवे स्टार मिळवून दिलेत. दोन वर्षांपूर्वी नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण जिंकून दिले तेव्हा मी, मेरे देश की धरती सोना उगले… गाणं गायलं होतं आणि कालही माझ्या त्याच भावना होत्या. जर तुम्ही अमेरिकेला क्रीडा राष्ट्र मानत असाल तर येत्या 10-15 वर्षांत भारत सुद्धा क्रीडा राष्ट्र असेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने