suprime court: महिलांसाठी जाहीर केली शब्दावली; सर्वोच्च न्यायालयाचे सुधारणावादी पाऊल !

 

ब्युरो टीम:  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमध्ये आणि युक्तिवादांमध्ये यापुढे जेंडर स्टिरियोटाइप(लिंग भेदभाव दर्शविणारे) शब्द वापरले जाणार नाहीत. महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या अपमानास्पद शब्दांवर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 'जेंडर स्टिरियोटाइप कॉम्बॅट हॅंडबुक' प्रकाशन केले आहे.

8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त सुप्रीम कोर्टात झालेल्या एका कार्यक्रमात कायदेशीर बाबींमध्ये महिलांसाठी आक्षेपार्ह शब्दांचा वापर थांबेल, लवकरच एक शब्दकोशही येईल, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानुसार, बुधवारी, हॅंडबुकचे प्रकाशन करताना, सरन्यायाधिश डी.वाय. चंद्रचूड म्हणाले की, “कोणते शब्द रूढीवादी आहेत आणि ते कसे टाळायचे हे न्यायाधीश आणि वकिलांना समजणे आता सोपे होईल. या हॅंडबुकमध्ये आक्षेपार्ह शब्दांची यादी असून त्या जागी वापरायचे शब्द व वाक्‍ये देण्यात आली आहेत. न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी, आदेश देण्यासाठी आणि त्याच्या प्रति तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. हे हॅंडबुक वकिलांसाठी तसेच न्यायाधीशांसाठी उपयुक्त आहे.’


या हॅंडबुकमध्ये पूर्वी न्यायालयांनी वापरलेले शब्द दर्शविले गेले आहेत. शब्द का चुकीचे आहेत आणि ते कायद्याचा आणखी विपर्यास कसे करू शकतात हेदेखील स्पष्ट केले आहे.


हॅंडबुक जनजागृतीसाठी; टीकेसाठी नाही

“हे पुस्तिका तयार करण्यामागचा उद्देश कोणत्याही निर्णयावर टीका करणे किंवा संशय घेणे हा नसून पुराणमतवादाची परंपरा किती नकळत सुरू आहे हे सांगणे हा आहे. स्टिरियोटाइपिंग म्हणजे काय आणि त्यातून काय हानी होते हे स्पष्ट करणे हा न्यायालयाचा उद्देश आहे. जेणेकरून न्यायालये महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर टाळू शकतील. हे हॅंडबुक लवकरच सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केले जाईल, असेही न्या.चंद्रचूड यांनी यावेळी म्हटले. तसेच, न्या.चंद्रचूड यांनी यापूर्वी “एलजीबीटीक्‍यू’ हॅंडबुक लॉंच केले असल्याचेही यापूर्वी सांगितले.


हॅंडबुकमधील काही शब्द

शब्द रिप्लेसमेंट

अफेअर विवाहबाह्य संबंध

प्रॉस्टिट्यूट/हुकर (पतुरिया) सेक्‍स वर्कर

अनवेड मदर (बिनलग्नाची आई) आई

चाइल्ड प्रॉस्टिट्यूट तस्करी करून आणलेले मूल

बास्टर्ड असे मूल ज्या आईवडिलांनी लग्न केलेले नाही

ईव्ह टीजिंग स्ट्रीट सेक्‍शुअल हरॅसमेंट

प्रोवोकेटिव्ह क्‍लोदिंग/ड्रेस (उत्तेजक कपडे) क्‍लोदिंग/ड्रेस

एफेमिनेट (जनाना) जेंडर न्यूट्रल शब्दाचा वापर

गुड वाइफ वाइफ (पत्नी)

कॉन्क्‍युबाइन/कीप (रखेल) अशी महिला जिचे लग्नाशिवाय इतर पुरुषांशी संबंध असतील.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने